अतिरेकी नव्हे, दहशतवादी म्हणा   

केंद्र सरकारने बीबीसीला झापले

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा उल्लेख अतिरेकी असा करणार्‍या बीबीसीला केंद्र सरकारने सोमवारी झापले आहे. ते अतिरेकी नव्हे तर, दहशतवादी आहेत, असे म्हटले आहे. 
 
पहलगाम येथील हल्ल्यानंतर बीबीसीने  वार्तांकन करताना हल्लेखोरांचा उल्लेख अतिरेकी असा केला होता. त्याचा समाचार केंद्र सरकारने घेतला आहे. बीबीसीचे भारतातील प्रमुख जॅकी मार्टीन यांच्याशी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने संपर्क साधून आपली तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. हल्ल्यात दहशतवाद्यांनी २६ जणांचे प्राण घेतले. त्यात बहुतांश पर्यटक होते. वृत्त प्रसारीत करताना हल्लेखोरांना तुम्ही अतिरेकी असे संबोधले आहे. ते सर्वस्वी चुकीचे आहे, अशा शब्दांत समज देखील दिली. 
 
या संदर्भातील औपचारिक पत्रही केंद्र सरकारने बीबीसीला पाठवले आहे. परराष्ट्र व्यवहारचा सार्वजनिक विभाग बीबीसीच्या वृत्तांवर नजर ठेवून असल्याचेही आवर्जून नमूद केले आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

Related Articles